शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 4 जून 2018 (10:49 IST)

सुभाष देशुखांचा राजीनामा घ्या : अजित पवार

आरक्षित भूखंडावर बेकायदा बंगला बांधल्याप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना अपात्र ठरवत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी माजी उपमुख्यंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. देशमुख यांनी लोकमंगल समूहाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचीही फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
अतिक्रमण करणार्‍या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्यात येते. त्याप्रमाणे देशमुख यांना अपात्र ठरवण्यात यावे. त्यांना अपात्र ठरवून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी. इंदापूर येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, आरक्षित भूखंडावरील बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याचा अहवाल सोलापूर नपा आयु्रतांनी उच्च न्यायालयास सादर केला, यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.