शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (14:32 IST)

प्लॅस्टिकमुळे व्हेलचा मृत्यू

थायलंडच्या सोंगखला भागात एका कालव्याद्वारे वाहून आलेल्या व्हेलचा अखेर मृत्यू झाला आहे. पाच दिवस या व्हेल माशाचा जीव वाचावा यासाठी प्राण्याचे डॉक्टर प्रयत्न करत होते.  मात्र जेव्हा या व्हेलची ऑटोप्सी करण्यात आली.  तेव्हा या व्हेल माशाच्या पोटात तब्बल ८० प्लॅस्टिकच्या बॅग सापडल्या असून त्यांचं वजन ८ किलोंच्या आसपास आहे. प्लॅस्टिक पोटात गेल्याने आणि ते न पचल्याने या व्हेल माशाची पचनसंस्था पूर्णपणे बिघडली. यामुळेच या व्हेल माशाचा मृत्यू झाला.
 
थायलंड सरकारने तिथल्या नागरिकांना प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर करावा अशी विनंती केली आहे, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाहीये. थायलंडमधील समुद्रकिनाऱ्यांवर प्लॅस्टिक बिनधास्तपणे फेकलं जातं. हे प्लॅस्टीक आता व्हेलसारख्या खोल समुद्रात विहार करणाऱ्या माशांसाठीही धोकादायक बनत चाललं आहे.