शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (08:45 IST)

माणसाच्या खिशात मोबाईल फुटला, मग

अति अत्यावश्यक गरज म्हणून  मोबाईलचा वापर फारच घातक होत असल्याचेही समोर येत आहे. मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला. मुंबईतील भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये  घटना घडली आहे. या स्फोटात कोणालाही इजा झाली नाही, भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये असलेल्या ‘बगिचा हॉटेल’मध्ये प्रकार घडला. संबंधित व्यक्ती दोन सहकाऱ्यांसोबत जेवायला हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी त्याने शर्टच्या खिशात दोन मोबाईल ठेवले,  बसले असताना अचानक एका मोबाईलमधून धूर येऊ लागला. काही क्षणातच मोबाईल पेटला होता. मोबाईल धारकाने फोन दूर फेकताच त्याचा स्फोट झाला. 
 
या घटनेत मोबाईल धारकाची छाती आणि बोटाला दुखापत झाली आहे. हा प्रकार पाहून हॉटेलमधील इतर व्यक्तीही सैरावैरा पळत सुटले. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे चांगला फोन घ्या आणि त्याला योग्य पद्धतीने वापरा म्हणजे असे अपघात टाळता येणार आहेत.