गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:13 IST)

धक्कादायक माहिती: अवनीला शुद्धीचं इंजेक्शन लागलं नाही

avani tigress
अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर त्याबाबत आता धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. अवनी या नरभक्षक असलेल्या वाघिणीला ठार करण्यापूर्वी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंच नसल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अवनी वाघिण नरभक्षक असल्याचं म्हणत तिला यवतमाळच्या जंगलामध्ये २ नोव्हेंबर रोजी गोळ्या घालून ठार करण्यात आलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवनी अर्थात टी – १ वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं नसल्याचा आरोप केला जात होता. पण, संबंधित टीमनं मात्र या आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र आता आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तरी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलं नसल्याचं म्हटल्यानं अवनीला ठार करणारे शिकारी आणि टीम समोरच्या अडचणी वाढल्या आहे.