वास्तुप्रमाणे पृथ्वीचे चुंबकीय वृत्त
वास्तुसाठी ज्या भुखंडाला निवडायचे आहे, तो पृथ्वीतत्वाचा एक रूप आहे. पृथ्वी एका मोठ्या चुंबकाप्रमाणे काम करते. तिचे चुंबकत्व आतल्या भागातून उत्पन्न होते. चुंबकाचे दोन समान ध्रुव असतात एक दक्षिण ध्रुव, दुसरे उत्तर ध्रुव. जमिनीची निवड करताना ज्या जमिनीवर घर बांधायचे आहे ती उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये किती अंशावर स्थित आहे या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याच आधारावर भूखंडाची दिशा ठरवली जाते. ज्या जमिनीच्या मध्यातून चुंबकीय वृत्त जाते, म्हणजे जी जमीन पूर्व-पश्चिम तसेच दक्षिण व उत्तरेकडून बरोबर मध्ये असेल ती चांगली जमीन असते.
चुंबकीय क्षेत्राच्या प्रत्येक अक्षांशावर वेगवेगळे प्रभाव पडतात. हा संशोधनाचा विषय आहे. अशी जमीन चुंबकीय वृत्ताच्या कोनात असेल तर (आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य) अशी जमीन घेऊ नये.
होका यंत्र : हल्ली चुंबकीय क्षेत्र जाणण्यासाठी होकायंत्र ( Magnetic Compass) वापरतात. ग्रंथात दिशा ओळखण्यासाठी दिवसा सूर्य आणि रात्री नक्षत्रांच्या मदतीने नियम दिले आहेत. पण याच्या आधारे दिशा ठरवणे सोपे नाही. त्यापेक्षा होकायंत्राने सोपे जाते. पूर्वी जहाजाची निश्चित दिशा ठरवण्यासाठी चुंबकीय सुई वापरत होते आणि त्या आधारावरच होकायंत्र बनवले गेले.
होकायंत्र कोणत्याही ठिकाणी उत्तर दिशा दाखवते. हे हातातल्या घड्याळाच्या डब्याच्या आकाराचे असते. यात चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा असतात त्या 360 अंशात विभागलेल्या असतात. त्याच्यामधील चुंबकीय सुई दक्षिणोत्तर स्थिर असते. त्याच्या आधारे सर्व दिशा व उपदिशांना अंशासहित मोजता येते. त्याचबरोबरच गुरुत्व मध्य जमिनीच्या किती अंश सरळ अथवा वाकडा आहे ते कळते.
जमिनीच्या मध्ये होकायंत्राला सपाट जागी ठेवा. काही वेळातच सुई उत्तर दिशा दाखवेल. त्यावरून इतर दिशा ओळखून वास्तूची रचना करावी. इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे ती म्हणजे सूर्य व चंद्राच्या दिशा नक्की का करता येत नाहीत? कारण ध्रुव तार्याशिवाय सूर्यमालेतील सर्व ग्रह व तारे आपली जागा बदलतात. सूर्यसुद्धा मूळ जागेपासून 23 1/2 अंश डिग्री दक्षिणेला सरकतो व पुन्हा हळूहळू आपल्या जागी येतो आणि तीन महिने उत्तरेला 231/2 अंश डिग्री सरकतो त्यामुळे दक्षिणायन व उत्तरायण काळ निश्चित वेगवेगळा आहे. म्हणूनच सूर्य आपल्या जागी स्थिर नसल्यामुळे त्याच्या आधारे आपण दिशा निश्चित करू शकत नाही.
पृथ्वीवरील चुंबकाप्रमाणे आकाशात ध्रुव तारा स्थिर आहे. त्याबरोबरच घर बांधण्याची जमिनही स्थिर रूपातच आहे. म्हणूनच उत्तर दिशेला प्रमाण मानून इतर दिशा व उपदिशा ज्ञात होतात व घर बांधले जाते.