मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

वास्तू शास्त्र : दरवाज्याजवळ झोपू नये

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. या वस्तूंचे खास नियम असतात. ते पाळलेत, तर आपल्या आयुष्यावर या वस्तूंचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, सुख समृद्धी प्राप्त होते आणि दारिद्र्य दूर होतं.
 
घरातील वस्तूंचं स्वतःचं योग्य असं स्थान असतं. त्या ठिकाणीच त्या असाव्यात. वाटेल तिथे वस्तू ठेवल्यास आपल्या आयुष्यावर त्यांचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशामुळे मनःशांती ढळते.  जर घरामधील पलंग दाराजवळ ठेवला असेल तर, रात्री शांत झोप लागत नाही. सतत बेचैन वाटत राहातं. अशा ठिकाणी पलंगावर झोपणाऱी व्यक्ती कधीही मन एकाग्र करू शकत नाही. रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. त्यामुळे चित्त अस्वस्थ राहातं. म्हणून दरवाज्याजवळ कधीही पलंग नसावा.
 
ज्या घरांमध्ये या छोट्या आणि साध्या नियमांचं पालन होतं, त्या घरातील लोकांना अशा प्रकारचा त्रास होत नाही. चित्तवृत्ती शांत राहातात. मन एकाग्र राहाते. यामुळे आर्थिक लाभ होतात आणि घरात सुख समृद्धी येते.