शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

बोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर

झाडांमुळे घरात सजीवता येते. हिरवळं कोणत्याही स्थानाची शोभा वाढवण्यात मदत करतं. नैसर्गिक वातावरणामुळे जीवनात अनेक सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. म्हणून जागेचा उपयोग करुन तिथे हिरवळ लावणे नैतिक रुपाने देखील आवश्यक आहे, कारण याने पर्यावरणाची रक्षा तर होतेच प्रदूषणापासून मुक्तीही मिळते. पण त्याआधी जाणून घ्या काही आवश्यक गोष्टी:
 
* अनेक प्रकाराचे झाडं नकरात्मक ऊर्जा प्रदान करतात. त्याविषयी जाणून घेतल्यावरच त्यांची लागवण करावी. जसे नागफणी आवास किंवा कार्यालयात ठेवल्याने नुकसान होतं. याचे काटे ऋणात्मक ऊर्जेत वृद्धी करतात.
 
* बोन्साय ( झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती) झाडं घरात ठेवल्याने तेथे राहणार्‍या लोकांच्या कामात अडथळे निर्माण होतात. या प्रकारे सुंदर दिसणारे बोन्साय आपल्या प्रगतीत विषासारखे आहे. याचे त्याग करणे योग्य ठरेल.
 
* काटेरी झाडं किंवा ज्या झाडांच्या पानातून, फांदीतून किंवा फूलातून दूधसारखं पांढरं द्रव निघतं, अश्या झाडांपासून सावध राहावे. हे आरोग्य आणि भाग्यासाठी धोकादायक असतात.
 
* सुकलेले, तुटलेले झाडंदेखील नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.
 
* झाडं लावणं शक्य नसल्यास त्याची आकृती किंवा चित्र लावणे देखील योग्य ठरेल.
 
- ज्योतिर्विद रामकृष्ण डी. तिवारी