शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

धनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...

घरातून नकारात्मक ऊर्जा दूर झाली तर सकारात्मक ऊर्जा आपोआप प्रवेश करते. आणि जिथे सकारात्मकता असेल तिथे धनाचा वर्षाव निश्चितच होईल. आमचं घर वास्तूप्रमाणे निर्मित असेल तरी काही वस्तूंकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विनाश होतो. वास्तूप्रमाणे अश्या अनेक वस्तू आहे ज्यांना आपण घरातून हटवले नाही तर दारिद्र्य येतं. परंतू या वस्तू हटवल्या तर आपणही सुखाने नांदाल. बघू कोणत्या वस्तू आहेत त्या...
कबूतराचे घरटे
घरात कबूतराने घरटे बांधले असेल तर दारिद्र्य आणि अस्थिरता येते. आपल्या घरात ही हे घरटे असेल तर ते दूर करा.

मधमाश्यांचे पोळे
मधमाश्यांचे पोळे धोकादायक तर असतो पण याने घरात दुर्भाग्य आणि दारिद्र्य येतं. याला घरापासून दूर करावे.
लूज तार
घरात लूज तार मुळीच ठेवू नये. किंवा घरातील एखादं इलेक्ट्रिक अप्‍लायंस काम करतं नसेल तर त्याला लगेच दुरुस्त करवावे किंवा हटवून द्यावे.

कोळीचे जाळ
घरात कोळीचे जाळ आपल्या जीवनात दुर्भाग्यपूर्ण घटनांचे संकेत आहे. हे जाळ लगेच हटवून घर स्वच्छ करावे.
भिंतीत पोचा
भिंतीत चीर अथवा पोचा असल्या लगेच दुरुस्त करवावे.

फुटलेली काच
वास्तूप्रमाणे फुटलेली काच वाईट प्रतीक आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. याने घरात दारिद्र्य येतं.
घरातील गच्चीवरील भंगार
अधिकतर लोकांच्या घराच्या गच्चीवर किंवा टॉवरवर जुन्या वस्तू किंवा भंगार ठेवलेला असतो, त्याला लगेच स्वच्छ केले पाहिजे. नाहीतर तिथे दारिद्र्याचा वास होतो.

वटवाघूळ
वटवाघुळाला वाईट आरोग्य, दुर्भाग्यपूर्ण स्थिती, दारिद्र्य किंवा मृत्यूचे प्रतिनिधी मानले गेले आहे. आपल्या क्षेत्रात वटवाघूळ दिसत असतील तर सूर्यास्तानंतर सर्व दारं खिडक्या बंद कराव्या. त्याला घरात शिरू देऊ नये.
गळणारा नळ
गळणार्‍या नळाने केवळ पाणी वाया जातं असे नाही तर याने घरातील सकारात्मक ऊर्जादेखील बाहेर निघते. म्हणून नळ दुरुस्त करवावा.

निर्माल्य
देवपूजा झाल्यावर निघणारं निर्माल्य जमा करून ठेवू नये. शक्यतो झाडांना घालावं किंवा त्यांचं कंपोस्ट तयार करावं.
वाळलेली पाने
घरात लागलेल्या झाडांची वाळकी पाने कापून वेगळी केली पाहिजे. अंगणात पडलेली वाळकी पाने, वाळकी गवत स्वच्छ करून बाहेर फेकावी.