मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

अपार धन हवं असल्यास हे करा....

money earning tips
धनाची लालसा सर्वांनाच असते. धन कमाविण्याचे अनेक उपायदेखील प्रचलित आहेत. प्रत्येकाला धन कमाविण्यासाठी सोपे उपाय असावे असे वाटतं असतं. तर येथे आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत ज्यातून आपण कोणताही एक उपाय अमलात आणून धन प्राप्ती सुगम करून शकता.
 
* दररोज महादेवाच्या पिंडीवर जल, बिल्वपत्र, आणि अक्षता वाहाव्या.
* महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा करावी.
* आठवड्यातून एक दिवस उपास करावा. सोमवार केल्यास धनाचे कारक चंद्र प्रसन्न होईल. मंगल केल्यास * मारुती, बुध केल्यास गणपती, गुरु केल्यास विष्णू, शुक्र केल्यास देवी लक्ष्मी, शनी केल्यास शनी देव आणि * रविवार केल्यास सूर्य देव प्रसन्न होऊन धन, सुख आणि सौभाग्याचे वरदान देतील.
* अनामिका बोटात सोनं, चांदी किंवा तांब्याची अंगठी धारण करावी.
* संध्याकाळी जवळीक मंदिरात जाऊन दिवा लावावा.
* पौर्णिमेला चंद्र पूजन करावे.
* श्रीसूक्त पाठ करावा.
* श्री लक्ष्मीसूक्त पाठ करावा.
* कनकधारा स्तोत्र पाठ करावा.
* कोणाशीही वैर ठेवू नये.
* पूर्णतः: धार्मिक आचरण असावे.
* घरात स्वच्छता राखावी ज्याने धन कायमचे आपल्या घरात स्थिर होईल.