गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

एका पोळीने टळतील संकट, उजळेल नशीब

नवीन कामात अडथळे येत असल्यास किंवा अडकलेला पैसा किंवा काम होत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही आपल्याला एक खूपच सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत ज्याने सर्व दुख-वेदना दूर होती. या उपाय केवळ एका पोळीचा आहे ज्यावर अमल करून आपण जीवनात याचा प्रभाव बघू शकाल.
 
दररोज पोळ्या बनवताना एक पोळी वेगळी काढून ठेवा. त्याचे चार तुकडे करा. या तुकड्यांवर गूळ, साखर किंवा खीर ठेवा.
* पहिला तुकडा गायीला खाऊ घाला. खाऊ घालताना कोणी आपल्याला बघता कामा नये. पोळी खाऊ घालताना सर्व कष्ट दूर व्हावे अशी मनात प्रार्थना करा.
 
* पोळीचा दुसरा तुकडा कुत्र्याला खाऊ घाला.
 

* पोळीचा तिसरा तुकडा कावळ्याला खाऊ घाला. यावेळी असे म्हणा की चारी दिशेला असणार्‍या कावळ्यांनी माझी बळी स्वीकारावी.
 
* चौथा तुकडा भिकार्‍याला द्या. आपल्या घरी येणार्‍या उपाशी भिकार्‍याला पोळीचा शेवटला तुकडा खाऊ घाला. अशाने आपले भाग्य उजळेल. सर्व कष्ट दूर होतील.