मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (00:04 IST)

घरातील भंगार ठरवते तुमचे सौख्य

साठवणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. घरातील हे सामान कुठे आणि कसे ठेवले आहे याचा परिणाम घरातल्यांच्या जीवनावरही होतो.
 
* पूर्व : ह्या दिशेला असणार्‍या भंगार सामानामुळे घरमालकाला काही अघटित घटनांना तोंड द्यावे लागते.
* आग्नेय : आग्नेयला असणार्‍या भंगारामुळे कर्त्या व्यक्तीची मिळकत खर्चापेक्षा कमी होण्यामुळे त्याला कर्ज होते. 
* दक्षिण : इथल्या बेडरूममध्ये भंगार भांडी, लाकडी सामान, माठ वगैरे ठेवल्यास मालकाच्या भावांना अडचणी व अडथळे येतात. घरमालकाच्या बोलण्यात गर्व व अहंकार दिसतो व पुढे तो जर्जर होऊन कष्टी होतो.
* नैऋत्य : घरात भंगार ठेवण्याची योग्य जागा पण तिथे ओलावा नसावा व योग्य प्रकाशही असावा. 
* ज्या घरात भंगार ठेवण्याची खोली इतर खोल्यांपेक्षा मोठी व अंधारी असते तेथील लोकांचे इतरांशी शत्रुत्व निर्माण होते. 
* पश्चिम : जुन्या वस्तू ठेवल्याने, दरवाजे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत ठेवल्यास, भिंती खराब असल्यास तेथे राहणार्‍या लोकांची कामे विलंबाने होतात. फसवणूक व लूटमारीतून उत्पन्न मिळवलेले असल्यास कर्ता पुरुष वाईट लोकांच्या संगतीत राहतो व घरात नेहमी वाद होतात व त्यावर दोषारोपही होतात.
* वायव्य : या ठिकाणी भंगार ठेवल्यास कर्त्याला मित्रांशी शत्रूत्व येते, मानसिक तणावाने मन विचलित होते तसेच त्याच्या आईला कफाचा व वाताचा त्रास संभवतो. या स्थितीवरून असेही लक्षात येते, की घराचा कर्ता पुरुष खूप लांबून येऊन इथे राहत आहे.
* उत्तर : इथे भंगार ठेवल्यास कर्त्या पुरूषाला बंधुसुख नसून सर्वांत धाकटा भाऊ विक्षिप्त असू शकतो. 
* ईशान्य : इथे भंगार ठेवल्याने घरातले लोक नास्तिक होतात. त्यांना संधीवाताचा त्रास संभवतो.
* घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या हाताच्या खोलीत भंगार ठेवल्यास त्या घरच्या स्त्रीला डोळ्यांचा त्रास होतो पती पत्नी संबंध व सहयोग यथातथाच असतो.