सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: रविवार, 4 नोव्हेंबर 2018 (00:00 IST)

वास्तुप्रमाणे ईशान्य कोपरा जपा !

जमिनीच्या उत्तर पूर्व कोपर्‍याला ईशान्य कोन म्हटले जाते. अशी म्हण आहे की या कोपर्‍यात देवी देवता आणि आध्यात्मिक शक्तींचा वास असतो. म्हणून घरात या कोपर्‍याला वास्तुशास्त्रात सर्वांत जास्त पवित्र मानले गेले आहे. शंकराचे एक नाव ईशान आहे. शंकराचे अधिपत्य उत्तर-पूर्व दिशेला असतं. 
 
या दोन्ही दिशेला मिळणार्‍या कोनावर उत्तर-पूर्व क्षेत्र बनतं, म्हणून हा कोपरा घर किंवा प्लॉटचा सर्वात शुभ आणि ऊर्जेचा स्रोत असलेला कोपरा असतो. या कोपर्‍यात दैवी शक्तींचा वास असतो. कारण या क्षेत्रात देवतांचे गुरू बृहस्पती (गुरू) आणि मोक्ष कारक केतूचा वास असतो. 
 
घराची निर्मिती करताना ईशान्य कोपर्‍याविषयी काही बाबी लक्षात ठेवाव्यात. 
 
हा कोपरा देवी देवतांचा असतो म्हणून येथे देवालय, ध्यान, योग किंवा आध्यात्मिक गोष्टी केल्या पाहिजे. 
 
घरातील सर्व सदस्यांना थोडा वेळ खास करून सकाळचा वेळा या कोपर्‍यात अवश्य घालवावा. यासाठी सर्वांत चांगला आणि सोपा उपाय म्हणजे या जागेवर देवघराची स्थापना केली पाहिजे. 
 
ईशान्य कोपर्‍यात केली जाणारी पूजा नेहमी शुभ, फलदायी आणि कुटुंबीयांना स्थायित्व देणारी असते.