गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (00:34 IST)

वास्तुनुसार या रंगाची घरे राहूला प्रभावीत करणारी असतात

वास्‍तुशास्‍त्राच्‍या नियमानुसार बांधकाम केल्‍यानंतरही घरात राहणा-या लोकांना शांती, समाधान लाभत नाही. याला कारणीभूत असतो घराला दिलेला रंग. प्रत्‍येक रंगाचे वैशिष्‍ट्ये असते. निर्सगाने आपल्‍यासाठी अनेक रंगाची उधळण केली आहे. मात्र घराला रंग कोणता द्यायचा याविषयी वास्‍तुशास्‍त्रामध्‍ये काही नियम सांगण्‍यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्‍यांनतर तुम्‍हाला आस्‍माणी संकटाचा सामना करावा लागणार नाही.
 
1- वास्‍तुशास्‍त्राच्‍या नियमानुसार घरामध्‍ये काळ्या रंगाची फर्शी शुभ नसते. काळा रंग किंवा काळ्या दगडाचे बांधकाम केले तर राहूचा कोप होतो.
2- जर शुक्र उच्च व केंद्र किंवा त्रिकोणात असेल तर, घराच्‍या सजावटीसाठी पीवळा रंग लाभदायक ठरतो.
3- जर गुरू ग्रहाचा कोप असेल तर पांढरा रंग धोकादायक ठरू शकतो.
4- जर गुरू- शुक्राचा संबंध असले तर, पीवळा किंवा पांढरा रंगामुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.
5- यदि भवन स्‍वामीच्‍या कुंडलीमध्‍ये शुक्राचा प्रभाव असेल तर पांढरा रंग लाभदायक ठरतो. शुक्राचा प्रभाव नसेल तर पांढ-या रंगाचा वापर करणे अशुभ ठरते.