रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (16:10 IST)

प्रश्न विचारले म्हणून चौकीदाराने सीबीआय अधिकारी हटवले - राहुल गांधी, जेटलींचे उत्तर

राहुल गांधी यांनी सीबीआयमध्ये सुरु असलेला वाद आणि राफेल डील प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, 'काल रात्री चौकीदारने सीबीआयच्या संचालकांना हटविले, कारण सीबीआयच्या संचालकांनी राफेलवर प्रश्न उपस्थित केले होते.' अधिकारी बदलामुळे सरकारवर जोरदार टीका सुरु झाली आहे. राजस्थान मध्ये निवडुका प्रचारात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी राजस्थानच्या झालावाड दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सीबीआयमधील वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
सरकारवर टीका होत असतांना भाजपा नेते अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशीनुसार एसआयटीकडून केली जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दलची माहिती दिली. सीबीआय देशाची प्रतिष्ठीत तपास यंत्रणा असून त्यांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सरकार तत्पर आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सरकारच्या कक्षेत येत नाही, असं जेटली यांनी म्हटलं. सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या मोठं शीतयुद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी करेल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना पदावर राहता येणार नाही,' असं जेटली म्हणाले.