1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (09:09 IST)

मोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल

rahul gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, उलट त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजक असून त्यांचे भले कसे होईल हे पाहत आहे. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी हेच धनाढ्य लोक ‘भाई’त्यांच्या आहेत. शेतकरी, गरीब, कामगार वर्गाला कधीच ‘भाई’म्हणत नाहीत, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 
 
जर तुम्ही सुटा-बुटात आला नाहीत तर मोदींचे भाई बनूच शकणार नाहीत, अशी टीका राहुल यांनी केली आहे. मध्य प्रदेशमधील दौऱ्याला सुरुवात केली तेव्हा ते बोलत होते. या पहिल्याच सभेत त्यांनी मोदींवर हल्ल केला. पंतप्रधानांच्या ह्रदयात शोषित व महिलांसाठी स्थान नाही. मात्र त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. ते कधीच शेतकरी आणि कामगारांचा उल्लेख ‘भाई’म्हणून करत नाही करणार नाहीत. गरिबांना ते ‘भाई’म्हटल्याचे कधी कोणी ऐकले का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी यांनी दातिया येथील पितांबरा शक्तिपीठात देवीचे दर्शन घेतले.