1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (09:02 IST)

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

shivaji maharaj
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याच काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. शिवस्मारकाचं कंत्राट प्रसिद्ध कंपनी एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आल्याची माहीती समोर आले आहे. यासाठी कंपनीला शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला गेला आहे किबहुना तितका वेळ लागणार आहे. याठिकाणी  शिवरायांच्या स्मारकाची उंची २१२ मीटर आहे तर अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक साकारले जाणार आहे. यामध्ये पुतळ्याची एकूणच उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे.या कागदपत्रांवरून छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष काम योग्य पद्धतीने करता यावे यासठी पुतळ्याची उंची 44 मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे समस्त महाराष्ट्र आणि देश, जगाला येत्या काही वर्षात शिवरायांचेभव्य स्मारक पाहता येणार आहे.