1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (09:00 IST)

पुण्यात तीन दिवस पाणी नाहीच फक्त एकच पंप सुरु

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतरही पालिकेच्या बंद केलेल्या दोन पैकी केवळ एकच पंप सुरु झाला आहे. पाणी उपसा करणारा एकुण तीन पैकी केवळ दोनपंप सुरु आहेत, अदयापही एक पंप बंद असल्यामुळे पाणी कपात सुरुच राहणारा असून, पाटबंधारे विभागाच्या एककल्ली  कारभार यामुळे  शहराच्या पुर्वभागाचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळी पाणीबाणी निर्माण झाली असून समस्त पुणेकर हैराण झाले आहेत. पाणीकपात करावीच लागेल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.  पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांशी लवकरच बैठक झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकर नागरिकांनी  पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला तर, पुणे महापालिकेला जेवढा पाण्याचा कोटा दिला आहे, त्याहून अधिक पाणी महपालिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही पाणी द्यावे लागते. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे आता नागरिकांना पाणी सर्व कारणे पाहता योग्य पद्धतीने वापरावे लागणर आहे.