मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हिस्सार , शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (12:09 IST)

देशद्रोह आणि हत्येच्या आरोपात स्वयंघोषित गुरू रामपाल दोषी

guru rampal
देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरु रामपाल याला हरियाणातील हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. आता त्याला काय शिक्षा सुनावली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
 
दरम्यान हिस्सार कोर्टाच्या तीन किलोमीटर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सुनावणीच्या दरम्यान 20 हजार समर्थक कोर्ट परिसर, तुरुंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. समर्थकांनी हिंसक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली आहे.