रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (09:27 IST)

नवीन चेहरे मंत्री होणार जुन्यांना बाहेरचा रस्ता भाजपात बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार असून मोठे बदल होणार आहे. मंत्रीपदावरुन हटवले जाणार आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यादी मंजूर झाली असून मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. माहिती नुसार  शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार असून, नाराज  शिवसेनेला यंदा अनेक खाती मिळू शकतं. मात्र, यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा दसरा मेळाव्यावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. हे सर जरी ठीक असले तरी विना विरोध आणि उत्तम पणे देवेंद्र फडणवीस यांनी जे सरकार चालवले आहे ते पाहता बदल हा फक्त फडणवीस सुचवतील असाच होणार आहे हे उघड आहेत.