रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:07 IST)

पाकिस्तान दिवाळखोरीत त्यांचा रुपया कमालीचा घसरला

पाकिस्तानात मधील निवडून आलेले इम्रान खान सरकार अक्षरशः भीकेला लागल आहे. देश चालवण्यासाठी आवश्यक निधी कमी पडत असल्यानं इम्रान खान सरकारनं पंतप्रधानांच्या घरी पाळलेल्या म्हशी २३ लाखांना विकल्या आहेत. सोबतच सरकारी मालकीच्या उच्चभ्रू गाड्यांचा लिलाव केला आहे. पण तरीही अर्थव्यवस्थेला पडलेलं खिंडार काही केल्या बुजत नसून मोठ्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे पाकने आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे  कर्ज मागितलं आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्ज मिळालं तर ठिक... नाहीतर पाकिस्तानी जनतेच्या हालाखीच्या स्थितीत आणखीन भर पडणार आहे. दोन तीन दिवसात डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची विक्रमी घसरण झाली असून, एका अमेरिकन डॉलरसाठी १३२ पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत पाकिस्तानला ८ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.  पाकिस्तान हे कर्ज फेडू शकला नाही, तर देशाला कर्जबुडव्या देश अशी उपाधी मिळणार आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे पाकिस्ताननं विशेष मदतीची याचना केलीय. त्यामुळे पाक आता काय करणार की आतंकी कारवाया थांबवून तो पैसा चांगल्या कामासाठी वापरणार तसे केले तर त्यांच्या देशाला मोठा फायदा होणार आहे