1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:18 IST)

महाबळेश्वरमध्ये थंडी, तापमान ११.६ डिग्री सेल्सिअस

mahabaleshwar
महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली असून तापमान शिमला इतके झाले आहे. गुरुवारी येथील तापमान ११.६ डिग्री सेल्सिअस होते. गुरुवारी देशातील दहा सर्वात कमी तापमान असलेल्या ठिकाणांची यादी हवामान खात्याने जाहीर केली. यात महाबळेश्वर पाचव्या स्थानवार आहे. बुधवारी महाबळेश्वरमधील तापमान हे १७.२ डिग्री सेल्सिअस होते. तर गुरुवारी हा पारा सहा अंशांनी खाली घसरला आहे. गेल्या दहा वर्षातील हे ऑक्टोबर महिन्यातले सर्वात कमी तापमान आहे. याआधी १९७२ मध्ये ऑक्टोबर महिन्यात १० डिग्री सेल्सिअस तापमान झाले होते. तसेच गेल्या काही वर्षात महाबळेश्वरमध्ये ऑक्टोबर महिन्यातील तापमान हे १४ ते १५ डिग्री पर्यंतच होते.