मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जबलपूर , मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (11:31 IST)

सत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे

मध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी दिवास्वप्न पाहू नये असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लगावला आहे.
 
राहुल यांना स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ते डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहात आहेत असाही टोला शहा यांनी लगावला. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सभेत शहा यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला.
 
सध्या राहुल मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राफेल करार, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मद्यांवर सातत्याने भाष्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींना राफेल करारात कसा फायदा करून दिला हे देखील सांगत आहेत.