मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (11:24 IST)

31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा : मुख्यमंत्री

विविध जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा घेऊन येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच राज्यातील विविध जिल्ह्यांध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शासकीय यंत्रणेला उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. महसूल व कृषी विभागाकडून आम्हाला अहवाल प्राप्त होत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
 
दरम्यान, मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ग्रामसडक योजना तसेच अन्य योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांची नंतर पोलीस अधिकार्‍यांसोबतही बैठक झाली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्ह्यांचा आलेख तसेच पोलिसांच्या घरांच्या विषयावरही चर्चा केली.