शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यातील एकही व्यक्ती उपचाराअभावी मृत होऊ देणार नाही असा संकल्प - मुख्यमंत्री

लातूर  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आतमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 
 राज्य शासनाच्या वतीने येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील एकही व्यक्ती उपचाराअभावी मरू देणार नाही असा संकल्प आम्ही सोडला आहे. त्यातून हे अटल महाआरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. हा केवळ दिखावा नाही. तर यातून गरजूंवर पुणे, मुंबई सारख्या ठिकाणच्या मोठ्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रीयाही केल्या जाणार आहेत. आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या तीन योजनांचा राज्यातील गरजू रुग्णांना मोठा फायदा होत आहे. केंद्राच्या योजनेमुळे तर पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. 
 
राज्यात लवकरच दीड लाख वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आता जागा उपलब्ध करून दिली जाईल. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. सध्या मराठवाड्यावर टंचाईचे सावट आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत टंचाईची सर्व माहिती हाती येईल. त्यानंतर केंद्र शासनाचे पथक बोलावून पाहणी करेल. त्यानंतर दुष्काळ जाहिर करण्यात येईल. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे असे फडणवीस म्हणाले. लातूर शहरातील शासकीय रुग्नालायासाठी कृषी महाविद्यालायाची १४ एकर जागा देण्याची मागणी अभिमन्यु पवारांनी केली आहे त्याला मान्यता लवकरात लवकर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. उजनी धरणाचे पाणी लातुर शहरास कसे देता येईल याबाबतचे प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, डॉ. अशोक कुकडे, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील उपस्थित होते.