रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सोलापुरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती

कामासाठी परजिल्ह्यात आलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन सहा महिन्यांची गर्भवती आहे. तेव्हा त्या मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कुटुंब बीड भागातील राहत असून पोलिसांनी तिचा जबाब घेतला आहे.
 
बीड तालुक्यातील एक कुटूंब कामासाठी टेंभूर्णी जिल्हा सोलापूर येथे आले होता. आई-वडिल दिवसभर कामाला गेल्यानंतर घरात केवळ १४ वर्षाची मुलगी राहयची. हीच संधी साधून तेथील गणेश खुळे, विलास खुळे या दोन विवाहित पुरूषांसह अनिल खुळे या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
 
दरम्यान पीडितेच्या पोटात दुखू लागले तेव्हा तपासल्यावर ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले.