गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भुजबळ यांची आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीचा होणार लिलाव

NCP leader Chhagan Bhujbal
नाशिक मर्चन्ट बँकेनचे  थकीत कोट्यावधी रुपये  कर्जामुळे पाच महिन्यांपूर्वी भुजबळांच्या शिलापूर येथील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीचा प्रतीकात्मक घेतला होता. मात्र तरीही कोणतीही रक्कम अदा केली नाही. त्यामुळे आता बँक जाहीर लिलाव करणार असून,  विक्रीसाठी त्यांनी नोटीस प्रसिद्ध केली आहे.
 
हा जाहीर लिलाव  ३० नोव्हेंबर रोजी होणार असून बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात दुपारी एक नंतर पार पडणार आहे. भुजबळ यांच्या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपये १ एप्रिल २०१७ पासून थकले आहेत.सोबतच व्याज व मूळ थकीत रक्कम आता या लिलावातून वसूल केली जाणार आहे असे बँकेने स्पष्ट केले आहे.
 
बँकेने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पुतणे समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ यांच्यासह सत्यने आप्पा केसकर यांनी कर्ज घेतले आहे.तर या कर्जात  त्यांना जामीनदार , संमतीदार म्हणून नितीन राका, दिलीप खैरे, विशाखा भुजबळ, शेफाली भुजबळ या सर्वांची  संमती होती.
 
बँकेने त्यानंतर कर्ज मंजूर केले आहे. मात्र हे कर्ज थकल्यामुळे बँकेने कारवाई सुरु केली आहे. या कंपनीची राखीव किंमत आठ कोटी बाबीस लाख अठरा हजार ठेवण्यात आली असून, दि सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अँसेटस अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ च्या नियम ८ अन्वये हा लिलाव बँक करणार आहे.

या लिलाव प्रक्रियेत कंपनीच्या संपूर्ण  जागेचे वर्णन सोबतच पाच मिळकती असल्याचे स्पष्ट आहे. या सर्व मिळकती पाचही बिनशेती एकूण क्षेत्रफळ ४ हजार २५० चौरस मीटर आहे. त्यावर ६००.४७ चौ.मी बांधीव क्षेत्र आहे. नोटीस आणि इतर कारवाई करून देखील कोणताच प्रतिसाद दिला नसला आणि कोणत्याही प्रकारे आर्थिक देय न दिल्याने बँकेने आधी ताबा घेत या मालमत्तेचा लिलाव करणार आहे.