सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

६२ लाखांच्या साठ्यासह बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना सील vvvv

यवतमाळ जिल्ह्यातील कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने कळंब ते बाबुळगाव रोडवरील एका जिनिंग प्रिसिंग कारखान्यातून  बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडलाआहे. हा थोडा नुसून या कारखान्याला ६२ लाखांच्या साठ्यासह सील करण्यात आले. याप्रकरणी सचीन अरुण कावळे (२८) याला अटक करण्यात आली.

याप्रकरणी अटकेतील आरोपींविरुद्ध  पर्यावरण संरक्षण अधिनियम, कीटकनाशक कायदा, रासायनिक खत नियंत्रण, जीवनावश्यक वस्तू अधिनियममधील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांनी या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. 

गुरूदेव जिनिंग मिलच्या आवारात बनावट कीटकनाशके व खतांची निर्मिती तसेच विशिष्ट विक्रेत्यांमार्फत पुरवठा-विक्री होत असल्याची  गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागनाथ कोळपकर यांच्या नेतृत्वात या कारखान्यावर धाड घालण्यात आली. जिल्हा  कृषी अधिकारी वानखडे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक शिवा जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर आदी या पथकात सहभागी होते.

या कारखान्यातून नेमका कुणाकुणाला पुरवठा झाला, पुरवठादार किती वर्षांपासून कारखान्याच्या कनेक्शनमध्ये आहेत, नेमका कुणाकुणाला हा माल विकला, याचा तपास पोलीस व कृषी विभाग करीत आहे. याप्रकरणी कळम येथील जय गुरुदेव कृषी केंद्र याला सील ठोकण्यात आले  आज सकाळपासून भरारी पथकाने तपासणी सुरू केली आहे.