मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्पष्ट  केल आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
 
दरम्यान,  पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता असे राष्ट्रवादीचे  प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.  येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ घातली असली, तरी राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा सांगितला आहे. परभणी आणि अमरावती या जागांची अदलाबदल करावी, अशी आमची मागणी असल्याचे काकडे यांनी सांगितले.