मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

इंदिराजी, राजीवजी यांचे बलिदान नव्हते: अवधूत वाघ

मुंबई- प्रदेश भाजप प्रवक्ते प्रा. अवधूत वाघ यांचे म्हणणे पडले आहे की इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी बलिदान वगैरे दिलेले नाही.
 
त्यांनी दोघांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न मांडत विचारले आहे की इंदिराजी आणि राजीवची यांची तर हत्या झाली होती, यात कसले बलिदान ?
 
त्यांनी आपल्या फेसबुक वालवरून आपले विचार प्रकट करत म्हटले की इंदिराजी व राजीवजी यांची हत्या झाली त्यांनी देशासाठी बलिदान वगैरे काही दिले नाही. जेव्हा स्वतःच्या इच्छेने एखादा वा एखादी प्राणाची आहुती देते ते बलिदान. इच्छा नसताना होते ती हत्या बलिदाना नंतर खटला चालवला जात नाही. हत्ये नंतर खटला दाखल होतो.
 
त्यांचे असे प्रकाराचे प्रचार बघून सोशल मीडियावर संतप्त पडसाद उमटले आहेत. पक्षाच्या वतीने अद्याप त्यावर कुणीही प्रतिक्रिया आलेले नाही. हे वाघ यांचे वैयक्तिक मत असू शकतं असे म्हटत भाजप हात वर करेल, अशी शक्यता दिसून येत आहे.