शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (00:03 IST)

इरफानचा गुपचूप भारत दौरा

अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन हा दुर्धर आजार असून लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तो तिथेच असून दिवाळीच्या निमित्ताने इरफान काही दिवस भारतात आला होता. सध्या त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा असून तो लवकरच शूटिंगलाही सुरुवात करणार असल्याचं समजतंय. पण त्यादरम्यान, इरफानने दोन दिवसांसाठी भारतात येऊन नाशिकमधल्या त्र्यंबकेश्र्वरचे दर्शन घेतल्याचं कळतंय. इरफानने या दौर्‍याची कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्र्वरचं दर्शन घेऊन इरफानने तिथे हवन आणि पूजासुद्धा केली. इरफानने त्याच्या आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी ही पूजा केल्याचं समजतंय. त्यानंतर लगेचच तो लंडनला रवाना झाला. इरफान 'हिंदी मीडियम' या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण शूटिंगसाठी पूर्ण वेळ देण्याला डॉक्टरांकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत तो पहिल्यासारखं नियमित काम करू शकणार असल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी  'हिंदी मीडियम'चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्यानेसिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. 2017 साली प्रदर्शित झालेला इरफानचा 'हिंदी मीडियम' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर इरफानसोबत झळकली होती.