सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उदयनराजे समर्थकांची फाईट चित्रपटाला खरी फाईट, फोडली गाडी दिला इसारा

साताऱ्यामध्ये ‘फाईट’ या चित्रपटाच्या निर्मात्याची गाडी फोडली आहे.  चित्रपटाचे जवळपास सर्व  पोस्टरही फाडण्य़ात आले.  साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटातील ‘साताऱ्यात फक्त मीच चालतो’ या डायलॉगवर आक्षेप घेतला आही हा तोडफोड़ प्रकार केला आहे. 
 
साताऱ्यात फाईट चित्रपटाचे ठिकठिकाणी प्रमोशनल पोस्टर्स लावले असून, गुरुवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राधिका पॅलेस येथे पत्रकार परिषद होती, यासाठी चित्रपटाचे निर्माते साताऱ्यात आले असता उदयनराजे समर्थकांनी चित्रपटातील ‘साताऱ्यात फक्त मीच चालतो’ हा डायलॉग काढून टाका असे सांगितले आणि गाडी फोडत सोबत प्रमोशनसाठी लावण्यात आलेले पोस्टर फाडले. साताऱ्यात फक्त खा. उदयनराजेच चालतात त्यामुळे तुम्ही पिक्चरमध्ये हा डायलॉग वापरु नका असे खडसावले आहे.  या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र याच्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारला जातो आहे.