testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दुष्काळ असेल, तर पाहुण्यांकडे जनावरे सोडण्याचा अजब सल्ला!

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळू लागला असतानाच, फडणवीस सरकारमधले मंत्री आपण कसे निर्दयी आहोत, याचे जणू पुरावेच देऊ लागले आहेत... याचा प्रत्यय नुकताच नगर जिल्ह्यात आला. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही जण पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन घेऊन गेले. या शेतकऱ्यांना दिलासा देणे, मदत करणे तर राहिलेच, मंत्रिमहोदयांनी त्यांना "दुष्काळ पडलाय तर बघत काय बसलाय, जनावरे पाहुण्यांकडे सोडा," असा अजब सल्ला दिला !
माणुसकीने न वागणाऱ्याला, माणूस आहेस की जनावर, असा प्रश्न केला जातो. मग दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांची अशी क्रूर थट्टा करणाऱ्याला काय म्हणायचे, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर होत चालली आहे. पण भाजपाचे सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही. काही भागांतच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी भागाच्या यादीमध्ये आपल्याही गावाचा समावेश होण्यासाठी शेतकरी नाईलाजाने प्रयत्न करतो आहे. पण त्याच्या नशिबी शिंदे यांच्यासारख्यांकडून होणारी थट्टा लिहिलेली आहे.
राम शिंदे यांच्या या असंवेदनशील वक्तव्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजपाच्या या असंवेदनशील सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये वाढती नाराजी आहे. शिंदे यांच्या वक्तव्यामुळे त्यात मोठीच भर पडली आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना ...

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल ...

IRCTC च्या शेअर्सची नोंदणी : भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग ...

IRCTC च्या शेअर्सची नोंदणी : भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग कंपनीच्या शेअर्सविषयी जाणून घ्या
इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड' (IRCTC) च्या शेअर्सची आज (14 ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, किंमत फक्त इतकीच आहे
टोयोटाने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार (Glanza) ग्लान्झाची स्वस्त आवृत्ती बाजारात आणली आहे, ...

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या ...

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ...