1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ती मोबाईलवर गेम खेळायची, हातावर कट लिहून केली आत्महत्या

maharashtra news
नागपूर येथे एका घटनेत हातावर इंग्रजी भाषेत ‘कट’ लिहून विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून  नरेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. मानसी अशोक जोनवाल असं विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसीने हातावर इंग्रजी भाषेत ‘कट’ शब्द लिहून गळफास घेतला आहे. हातावरील ‘कट’ शब्दामुळे तिच्या आत्महत्येभोवतीचं गूढ वाढले आहे. मानसीला मोबाईलवर गेम खेळण्याची खूप सवय जडली  होती. त्यामुळे ब्ल्यू व्हेल गेममुळे मानसीने जीवन संपवलं असेल का ?  शंका पोलिसांनी वर्तवली आहे. 
 
मानसीने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर आवडीचं कॉलेज न मिळाल्याने ‘ड्रॉप’ घेतला त्यामुळे तेव्हापासून ती घरीच असायची. घरात ती जास्तीत जास्त मोबाईलवर गेम खेळत बसायची.आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून, मानसीच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे तपासात उघडकीस होणार आहे.