सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विधानपरिषदेत धनंजय मुंडे आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पकडलं. यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा गंभीर आहे. कारण, 72 साली एक वर्षांचा दुष्काळ होता. आता, शेतकरी 4 वर्षांपासून दुष्काळ सोसत आहे, कधी कोरडा दुष्काळ कधी नोटाबंदीमुळे तर कधी बोन्डअळीमुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहेत. मात्र, सुरुवातीपासून सरकार दुष्काळ हाताळण्यास अपयशी, ठरल्याचं मुंडें यांनी म्हटलं  आहे.
 
धनंजय मुंडेंनी दुष्काळी परिस्थीतीवर बोलताना, सरकारची दुष्काळाबाबतची धोरणं चुकीची असल्याचं म्हटलंय. तसेच माझी ही सरकारवर टीका नसून सूचना समजावी, असा टोलाही त्यांनी लगावला. कदाचित मुख्यमंत्री आणि सरकारचा दुष्काळाबाबत अभ्यास कमी पडला आहे. तर, दुष्काळ संहिता म्हणजे पोरखेळ आहे. 2016 ची संहिता 200 मंडळात दुष्काळ का मान्य करत नाही. केंद्राची सन 2016 ची दुष्काळ संहिता राज्याच्या हिताची नव्हती, ती शासनाने का स्वीकारली? असा सवालही मुंडेंनी सरकारला विचारला आहे.