बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत प्रभाकरनच्या जयंती दिनाचे फलक

मुंबईतील मुलुंडमध्ये एलटीटीईचा संस्थापक आणि राजीव गांधींचा मारेकरी व्ही प्रभाकरन यांच्या जयंती दिनाचे फलक झळकले आहेत.  प्रभाकरन हा आमचा नेता असून त्याचा जन्मदिवस हा शौर्य जन्म दिवस आहे. त्याला अभिवादन करण्यासाठी नाम तमिळ कच्ची या बॅनरखाली सर्व तमिळ जनतेनं एकत्र यावं अशा आशयाचा हा फलक आहे. यावर नाम तमिळ कच्ची या पक्षाच्या कुठल्याही नेत्याचं नाव नाही. त्यामुळं हा फलक नेमका कोणी लावला याचा शोध पोलीस घेत आहेत. 
 
स्वतंत्र तमिळ राज्याच्या मागणीसाठी व्ही. प्रभाकरन याने एलटीटी या संघटनेची 1976 साली स्थापना केली होती. 32 देशांनी प्रभाकरनच्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं. 18 मे 2009 साली श्रीलंकन सैन्यासोबत झालेल्या चकमकीत प्रभाकरन ठार झाला होता.