सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 डिसेंबर 2018 (08:59 IST)

‘इंडियन’च्या सिक्वलनंतर कमल हसन चित्रपटातून संन्यास घेणार

आगामी चित्रपट ‘इंडियन’च्या सिक्वलनंतर अभिनेता कमल हसन चित्रपटातून संन्यास घेणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली. राजकारणासाठी अधिकाधिक वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
”इंडियन २’हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे,’असं त्यांनी सांगितलं. १९९६ मध्ये बॉक्स ऑफीसवर तुफान गाजलेल्या ‘इंडियन’या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.येत्या काही दिवसांत ‘इंडियन २’च्या शूटींगला सुरू होणार आहे. यामध्ये कमल हसन यांच्यासोबत काजल अग्रवालची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून कमल हसन यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला. मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन करत त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.