गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 डिसेंबर 2018 (08:54 IST)

'२.०' ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, आतापर्यंत ४०० कोटीचे कलेक्‍शन

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट '२.०' ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४०० कोटी रुपयांचे कलेक्‍शन आहे. चित्रपट समीक्षकांच्‍या माहितीनुसार, या आठवड्‍यात जगभरात कमाईच्‍या बाबतीत हा चित्रपट पहिल्‍या क्रमांकावर आहे. यूएसमध्‍ये हायएस्ट ग्रोसिंग साऊथ इंडियन चित्रपट बनला आहे. 
 
पहिल्‍या दिवशी चित्रपटाने हिंदी व्‍हर्जनच्‍या माध्‍यमातून २०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरया दिवशी चित्रपटाने हिंदी व्‍हर्जनमध्‍ये १८ कोटींची कमाई केली आहे. त्‍यानंतर, चित्रपटाने तिसर्‍या दिवशी शनिवारी, २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चौथ्‍या दिवशी चित्रपटाने ३४ कोटींचा गल्‍ला जमवला. अशी एकूण ९५ कोटींची कमाई (हिंदी व्‍हर्जन) झाली.  
 
यूएसएमध्‍ये २४.५५ कोटी, यूकेमध्‍ये ४.५४ कोटी, ऑस्ट्रेलियामध्‍ये ४.८७ कोटी, न्यूझीलँड आणि फिजीमध्‍ये ८७.९७ लाखांची कमाई केली आहे. दिग्‍दर्शक शंकर यांचा हा चित्रपट यूएस बॉक्स ऑफिसवर टॉप फाईव्‍ह ऑल टाईम हायएस्ट ग्रोसिंग साउथ इंडियन चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४०० कोटी रुपयांची वर्ल्डवाईड कमाई केली आहे.