मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (08:47 IST)

अवघ्या काही तासांत ‘2.0’ चित्रपट लीक

सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘2.0’हा चित्रपट गुरुवारी लीक झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांतच तो ‘तमिळरॉकर्स’या वेबसाइटवर लीक झाला. यापूर्वी काला, संजू, कबाली यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या आधी किंवा प्रदर्शनाच्या दिवशीच इंटरनेटवर लीक झाले होते.
 
पायरसीचा निर्मात्यांना मोठा फटका बसत आहे. ‘2.0’च्या बाबतीत असं घडू नये म्हणून निर्मात्यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान मद्रास हायकोर्टानं ३७ इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला १२ हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यात ‘तमिळरॉकर्स’या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाइटच्या २ हजार मायक्रोसाइट्चादेखील समावेश आहे. तामिळ रॉकर्स वेबसाईट ब्लॉक केल्यानंतर तिच्याच हजारो मायक्रोसाइट्स सक्रिय झाल्या आणि यातून चित्रपट लीक व्हायला सुरूवात झाली आहे.