मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (08:28 IST)

सरकारने शेतकरी वर्गाच्या जखमेवर मीठ चोळले - जननायक संघटना

The government leaked
शासनाने दुष्काळग्रस्त पध्दत व चुकीचे निकष तसेच २०१६ च्या मुल्यांकनाच्या आधारे राज्यातील १५१ तालुक्याचा दुष्काळ यादीत प्राधान्याने समावेश केला आहे. केवळ ११२ तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले असून त्यात लातूर जिल्ह्यातील नऊ तालुके वगळून भयानक नैसर्गिक कोप व नापीक शेती या आर्थिक अडचणीत तसेच विवंचनेत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या भावनेचा विचार न करता त्यांच्या जखमेवर मीठ शासनाने चोळले असल्याचा आरोप करून शेतकरी बांधवाच्या प्रती संवेदना व्यक्‍त करून या निर्णयाचा शासनाने त्वरीत पुनर्विचार करून दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जननायक संघटनेच्या वतीने जनसंवाद यात्रेनिमित्त लातूर तालुक्यातील रामेगाव येथे आयोजित शेतकरी बांधवाच्या बैठकीत बोलताना केले.
 
जननायक संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांतरव शेळके, बाबासाहेब देशमुख, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, आदीसंह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.