रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (09:16 IST)

अभिनेता संदीप कुलकर्णी करणार ‘डोंबिवली रिटर्न’ची निर्मीती

अभिनेता संदीप कुलकर्णी आता संदीप ‘डोंबिवली रिटर्न’चित्रपटाची निर्मीती करत असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
‘डोंबिवली रिटर्न ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. या चित्रपटातून सायकोलॉजिकल थ्रिलर पाहायला मिळणार असंही संदीप म्हणाला. या चित्रपटाचं पोस्टर संदीपनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.