शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (14:40 IST)

'पॉंडिचेरी' द्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात

सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एका धमाकेदार पद्धतीने करणार आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील तगड्या स्टारकास्टचा समावेश असलेल्या 'पॉंडिचेरी' या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने 'पॉंडिचेरी'चे दिग्दर्शक सचिन कुंडलकर सोबत ती पहिल्यांदाच काम करणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, सध्या ती त्याच्या स्क्रिप्ट रिडींगमध्ये व्यस्त आहे. थोडक्यात काय तर, नवीन वर्षाच्या अमृतमय स्वागतासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !