शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (11:41 IST)

रणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज !

ranveer
मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती आहे, हे आता जगजाहीर झालं आहे. रणवीरदेखील आपल्या या ग्लॅमरस चाहतीला दरवेळी काही न काही सरप्राईज देताना आपल्याला दिसून येतो. मात्र, त्याने यावेळी अमृताला दिलेलं सरप्राईज या सर्वांहून हटके आहे. कारण, आपापल्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे या दोघांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नव्हतं, पण रणवीरने वेळात वेळ काढत अमृताच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिची भेट घेतली. रणवीरचे हे सरप्राईज व्हिजिट अमृतासाठी आनंदाचा मोठा धक्काच ठरला ! 
 
त्याचे झाले असे की, जोगेश्वरी येथील फिल्मिस्तान स्टुडियोमध्ये 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे शूटिंग चालू होते. त्याच जवळपास सुरु असलेल्या एका हिंदी कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये रणवीर सिंग आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यादरम्यान अमृतादेखील इथेच असल्याचं त्याच्या लक्षात आले. सोशल नेटवर्किंगद्वारे सतत जरी भेटत असलो तरी, प्रत्यक्षात भेटण्याची ही नामी संधी त्याने हेरली. आणि तो थेट 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' शोच्या सेटवर जाऊन धडकला. रणवीरच्या येण्यानं केवळ अमृतालाच नव्हे तर सेटवरील बच्चेकंपनीला देखील मोठा आनंद झाला.