मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (14:33 IST)

रणवीरने दिल्या अमृताला वाढदिवसाच्या इन्स्टा शुभेच्छा

बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग पडद्यावर जितका प्रसिद्ध आहे अगदी तितकाच प्रसिद्ध पडद्यामागेदेखील आहे. त्याच्या मनमोकळ्या स्वभावावर अनेकजण फिदा असून, मराठीतील स्टार अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील त्याला अपवाद नाही. तसेच, अमृता रणवीरची खास मैत्रीणदेखील आहे. अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे असो, वा डान्स परफॉर्मन्स असो, रणवीरची सकारात्मक प्रतिक्रिया तिला असतेच ! त्यामुळे, आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस विसरेल तर रणवीर कसला ?. काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या त्याच्या शाही विवाहसोहळ्यात व्यस्त असूनही, त्याने अमृताचा वाढदिवस विस्मृतीत जाऊन दिला नाही.
अमृताला भेटणं जरी शक्य नसलं तरी, त्याने तिच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आवर्जून पाठवल्या आहेत. त्याने अमृताला 'हॅलो गॉर्जिअस !!!, हॅप्पी बर्थ डे !!!.' असा इन्स्टा संदेश केला असून, 'तू एक खास व्यक्ती आहेस, या संपूर्ण जगाचे अमाप प्रेम आणि भरपूर आशीर्वाद तुला मिळो. तसेच  हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरो. माझ्याकडून तुला खूप खूप प्रेम' अश्या शुभेच्छा दिल्या.  अमृतानेही त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देत, त्याचे आभार मानले.