शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (15:44 IST)

मृण्मयी आनंद घेतेय सुट्‌ट्यांचा

mrunmayee deshpande
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्निल राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्तम आणि अनुरुप जोडी समजली जाते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात शिवाय दोघांचं एकमेकांशी चांगलंच पटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील ही जोडी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणार्‍यांना आणि वाचणार्‍यांना दोघं काही ना काही सकारात्क ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात.  नुकतंच मृण्मयीने पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. अभिनेत्री मृण्मयी पतीसोबत आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला मृण्मयीने कॅप्शनही दिले आहे. आणि सुट्‌ट्यांना सुरूवात बर्‍याच दिवसांपासूनची प्रतीक्षा.. मृण्मयीच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाले आहे. व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी शुभमंगल पार पडले होते. आपल्या अभिनयाने मृण्मयीने  रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा मग रुपेरी पडदा, मृण्मयीने रसिकांवर जादू केली आहे. 'कट्यार काळजात घुसली' आणि 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्रिहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांसोबतच मृण्मयीने कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमातही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.