मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (14:27 IST)

म्हणजे खरे सुख.....

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप.
महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ. 
कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी. 
कोणत्याही गोष्टीचे अप्रुप असतांना अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव.
आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी तृप्ती. 
रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख.
Be positive  ह्या जगण्यावर,ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे.