शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (09:25 IST)

'उरी' ने १५० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला

आदित्य धर दिग्दर्शित 'उरी' येत्या काही दिवसांमध्ये २०० कोटींच्या घरात ते पोहोचण्याची चिन्हं आहेत. सध्या या चित्रपटाने १५० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याविषयीची माहिती दिली. 'उरी'ने तिसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी सुरु ठेवली असून, आतापर्यंत चित्रपटाची कमाई, १५७. ३८ कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 
 
विकी कौशल, मोहित रैना, यामी गोतम, परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'उरी....' या चित्रपटातून भारतीय सैन्यदलाने केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.