मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मेकअप टिकत नाही नवविवाहितेची आत्महत्या

मेकअप टिकत नसल्यानं नाशिकमध्ये एका महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नाशिकच्या अंबडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करणारी महिला नवविवाहित असल्याची माहिती मिळते आहे. दत्तनगर परिसरात माऊली चौक येथे रुखमा भास्कर खरचाण ( वय २७ ) ही नवविवाहिता राहत होती.

बुधवारी सकाळी ८.३० वाजता पती कंपनीत कामावर गेल्यावर घरी कोणीच नसताना रुखमाने बाथरुममध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुखमाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांना ही चिठ्ठी मिळाली आहे. ‘माझ्या डोळ्यातुन पाणी येत असल्याने काजळ डोळ्यात लावता येत नव्हते व सुंदर दिसत नसल्याने आत्महत्या करत आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. अंबड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून इतर काही कारण आहे का ? याची कसून तपासणी पोलीस करत आहेत.