गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकरी कर्जमाफी झाली का - आदित्य ठाकरे

लातूर: एप्रिल-मे मध्ये येणारा दुष्काळ यंदा ऑक्टोबरमध्येच आला. दुष्काळग्रस्तांचा आवाज कुणी ऐकत नाही. सेनेनं मदत केली आहे आणि करीत राहणार असं वचन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. ते पेठ येथे बोलत होते. यावेळी त्यांनी एका शेतकर्‍याया घरी जाऊन भेट घेतली, विचारपूस केली. जनावरांना चारा दिला. या प्रसंगी बोलताना त्यांनी कर्जमाफीचे वाभाडे काढले. 

ऐतिहासिक कर्जमाफी असे फलक लावतात, झालीय का कर्जमाफी असा प्रश्न त्यांनी विचारताच नाही असे उत्तर जमलेल्या लोकांनी दिले. यावेळी खा. रवींद्र गायकवाड, शिवसेना जिल्हाध्यक्ष नामदेव चाळक, सुनिता चाळक, संतोष सोमवंशी, शोभा बेंजरगी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुढे आदित्य ठाकरे चलबुर्गा आणि किल्लारीकडे रवाना झाले.औसा तालुक्यातील मौजे चलबुर्गा, बुधोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. मला विद्यार्थ्यांनी दुष्काळाचे चित्र भेट दिले सबंध महाराष्ट्रात अशी दुष्काळी परिस्थिती आहे पाऊस नाही पण केवळ अश्रूंचा पाऊस पडत आहे. या भागात अरबी ची पेरणी झाली नाही असे सांगण्यात आले. मी तर शहरी बाबू आहे पण शिवसैनिक म्हणून मी तुमच्या संकटात तुमच्या सोबत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘स्वतःचे बरे वाईट करून घेण्याचा विचार मनात आणू नका असा विचार मनात आला तर शिवसेनेच्या आठवण काढा शिवसेना तुमच्या मदतीसाठी उभी राहील. आज पर्यंत मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळ येत होता आता मात्र ऑक्टोबरपासूनच दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आहे. दुष्काळ कितीही गंभीर असू द्या शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील’ असा विश्‍वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकांना दिला.