गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (10:01 IST)

सुप्रिया सुळे दहा वर्षांनी निवडणुका लढवणार नाही विद्यार्थिनीला दिली लोकसभेची ऑफर

supriya sule
पुणे येथील बारामती मतदार संघातील सहा तालुक्यातील विद्यार्थीनींना 6 हजार सायकलींचे वाटप कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी विद्यार्थीनींशी संवाद साधताना त्यांना मोठे झाल्यावर काय व्हायचे असा प्रश्न, खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारल होता, त्यावेळी मुळशी तालुक्यातील एक विद्यार्थीनी मला खासदार व्हायचंय आहे असे त्यांना सांगितलं; यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी १० वर्षांनी निवडणूक लढवणार नाही, तेव्हा मी तुला संधी देईल असे म्हणत विद्यार्थीनीला लोकसभा लढवण्याची ऑफर दिली आहे. तर तू आताच पावर साहेबांना तुझे नाव संग ते तुला तिकीट देतील असा सल्लाही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बारामती तालुक्यातील विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी टाटा ट्रस्टचे तारापाेरा सुद्धा उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की तुम्ही सांगा  मी कुठल्या भाषेत भाषण करु मराठी, इंग्रजी या भाषा विद्यार्थीनी सांगत असताना काही विद्यार्थीनी हिंदी म्हणाल्या, तेव्हा तुम्हाला लो कसभा लढवायची आहे का म्हणून हिंदीत बोला म्हणताय असा मिश्किल प्रश्न देखील त्यानी केला. सुळे म्हणाल्या, बारामती मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत 25 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यातील 10 टक्के सायकल या आशा वर्करला देण्यात आल्या. टाटा ट्रस्टने सायकल उपलब्ध करुन दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानते असे त्यांनी स्पष्ट केले.