मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (13:33 IST)

जिनो फोन ग्राहकांसाठी दोन नवे प्लान लाँच

Launch of two new plans for phone customers
रिलायन्स जिओने जिओ फोनच्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा दोन नवीन प्लान आणले आहेत. मोठी वैधता असलेले 594 रुपये आणि 297 रुपयांचे दोन नवे प्लान जि‍ओने लाँच केले आहेत, याआधी जिओने 1 हजार 699 रुपयांचा वार्षिक प्लान आणला होता. हा प्लान सर्व ग्राहकांसाठी होता. परंतु, जिओचे हे दोन्ही प्लान केवळ जिओफोनसाठीच उपलब्ध आहेत. 
 
594 रुपयांच्या प्लानमधील वैधता ही 168 दिवसांची आहे, या प्लानमध्ये जिओफोन ग्राहकांना अनलिमिटेड लोकर आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच अनिलिमिटेड डेटा मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला 300 एसएमएसही मिळणार आहे. दुसर्‍या प्लानमध्ये 297 रुपयांत 84 दिवसांची वैधता आहे. यात जिओफोन ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच अनलिमिटेड डेटा मिळणार आहे, या प्लानमध्ये दररोज डेटाची मर्यादा 0.5 जीबी आहे. त्यानंतर 64 केबीपीएसवर येणार आहे. 300 एसएमएस मिळणा आहे. 
 
जिओच्या 1,699 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 1.5 जीबीचा 4 जी  डेटा जिला जातो. अनलिमिटेड लोकल कॉल, एसटीडी आणि रोमिंग व्हाईस कॉलिंग, 1.5 जीबीचा 4 जी डेटा, 100 एसएमएस प्रतिदिन मिळतो. या प्लानची वैधता वर्षभर (365 दिवस) इतकी आहे.